Telelife

Home

Telelife Medicare (टेलीलाईफ मेडीकेयर) काय आहे?

By: Telelife Medicare

परिचय

मोठ्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या ग्रामीण तसेच उपनगरांमध्ये, मोठ्या संख्येने नागरिकांना सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांवर अवलंबून राहावे लागते. यासारख्या भागांमध्ये, अशा आरोग्य सुविधांकडे जाण्यासाठी तसेच आरोग्य सुविधांवरील लांबच्या लांब रांगांमध्‍ये बराचसा अनुत्पादक वेळ वाया जातो. तसेच, लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग प्रवास करू शकत नाही कारण ते एकतर अतिशय मागणी असलेल्या व्यवसायात काम करत आहेत किंवा घरबसल्या आहेत, शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत आणि त्यांना नियमित वैद्यकीय सहाय्य आणि काळजीची गरज आहे. आपल्या कुटुंबाची काळजी सर्वांनाच असते. प्रत्येक व्यक्ती स्वतःबरोबर त्यांच्या आप्तस्वकीयांसाठी योग्य दारात आणि उत्कृष्ट दर्जाचे उपचार अपेक्षित करतो. कोरोना काळामध्ये तर आरोग्य सुविधांचा तुटवडा सर्वांनाच जाणवला. ग्रामीण तसेच उपनगरांमधील आरोग्य सुविधांचा योग्य तो पुरवठा करण्यासाठी आम्ही एक उपक्रम करण्याचे योजिले आहे.

समस्या विधान

  • गावांमध्ये रुग्णवाहिका (Ambulance) सारख्या सुविधा कुठे आहेत याबद्दल माहिती नसणे. तसेच, रुग्णांसाठी योग्य रुग्णवाहिका कोणती याबद्दल ज्ञान नसणे .
  • गावामध्ये औषधांवर अतिरिक्त पैसे खर्च करणे. स्वस्त आणि मुबलक दरात औषधे उपलब्ध नसणे.
  • डॉक्टर, लॅब यांसारख्या आरोग्य सुविधांवरील लांबच्या लांब रांगांमध्‍ये रुग्णांचा अमूल्य वेळ वाया जाणे.
  • कोरोना सारख्या संकटांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसणे.

आमची उद्दिष्टे

  • आणीबाणीच्या (Emergency) परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांची वेळ उपलब्ध करून देणे.
  • रुग्णांना मुबलक प्रमाणात आणि सवलतीच्या दरांमध्ये त्यांच्या नजीकच्या मेडिकल मधून औषधे उपलब्ध करून देणे.
  • रुग्णांना रक्त, लघवी तपासणी, यांसारख्या तत्सम तपासण्या अत्यंत मुबलक दरात आणि जमल्यास घरपोच उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर एम.आर.आय.(MRI) आणि सी.टी स्कॅन (CT Scan) सारख्या सुविधा नजीकच्या केंद्रामधून अत्यंत मुबलक दारात आणि कमी वेळात उपलब्ध करून देणे.
  • आणीबाणीच्या (Emergency) परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी होणारा आवाजावी खर्च कमी करणे.
  • सर्वांना योग,व्यायाम, आयुर्वेद यांच्या वापरातून त्यांचे जीवन सुधृढ आणि निरोगी करण्यास मदत करणे.

आम्ही कोण आहोत?

Telelife Medicare (टेलीलाईफ मेडीकेयर) ही फक्त एक कंपनी नसून, समाजाच्या आरोग्यविषयक तक्रारी सोडवण्यासाठी उभी झालेली एक चळवळ आहे. आम्ही आमच्या माध्यमातूम, ग्रामीण तसेच उपनगरांमधील आरोग्यविषयक सुविधांचे जाळे विणण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या माध्यमातून, तुम्हाला बहुतांश आरग्यविषयक सुविधा, फक्त एका ऍपद्वारे उपलब्ध होणार आहेत. आणीबाणीच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या असाहाय्य नातेवाईकांची, आरोग्यसेवांमध्ये होणारी लूट थांबवून त्यांना योग्य आणि माफक दरांमध्ये उपचार आणि सुविधा उपलब्ध करून देणे आमचे परम उद्दिष्ट आहे.

या स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याचे आरोग्य योग्य पद्धतीने सुदृढ करण्याचा अधिकार आहे. आम्ही याच उद्देशाने आपल्या भागांमध्ये लवकरच उपलब्ध असणार आहोत. तर आमच्या उद्देशपूर्तीसाठी तुम्ही नक्की हातभार लावा. आमच्याबद्दल आजून जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया (Social Media) चॅनेल ला नक्की फॉलो (Follow) करा.धन्यवाद !!